Nitin Gadkari house in Nagpur : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील घराला बॉम्बने उडवण्याची धमकी ; वाचा सविस्तर

Share News

Nitin Gadkari house in Nagpur : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील घराला बॉम्बने उडवण्याची धमकी ; वाचा सविस्तर

Share News

महाराष्ट्र हेडलाईन्स : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या नागपूर (Nagpur) येथील घराला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. ही धमकी पोलिस नियंत्रण कक्षाला फोनद्वारे दिली गेली. या फोननंतर पोलिस विभागात खळबळ उडाली. पोलिसांनी सतर्क होत काही वेळातच आरोपीला अटक केली आहे.  (Threat to blow up Union Minister Nitin Gadkari's house in Nagpur)

११२ क्रमांकावर आला फोन...  

पोलिस नियंत्रण कक्षाच्या ११२ क्रमांकावर रविवारी सकाळी ८:४६ वाजता फोन आला. यावर गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. यानंतर पोलिसांनी तात्काळ स्थानिक पोलिस ठाण्याला याची माहिती दिली.


व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा...


श्वान पथकाने शोधमोहीम राबवली : 

धमकीचा फोन आल्यानंतर प्रतापनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिस व श्वान पथकाने गडकरी यांच्या निवासस्थानी शोधमोहीम राबवली.

धमकी देणारा आरोपी नागपूरचा रहिवासी :

काही तासांतच पोलिसांनी धमकी दिलेल्या आरोपीला अटक केली. आरोपीचे नाव उमेश विष्णू राऊत असून, तो नागपूरमधील मेडिकल चौकात असलेल्या एका देशी दारू दुकानात काम करतो. पोलिसांनी त्याला नागपूरमधील बिमा दवाखान्याजवळून अटक केली.

आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरू : 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) सध्या नागपूरमध्येच उपस्थित आहेत. अटक केलेल्या आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, धमकी देण्यामागचा हेतू शोधला जात आहे. या घटनेमागे इतर कोणते हेतू किंवा संदर्भ आहेत का, याचाही तपास केला जात आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

Nagpur, Maharashtra: Union Minister Nitin Gadkari received a bomb threat at his Wardha Road residence via a call to police helpline 112
DCP, Nagpur Zone 1, Rushikesh Reddy says, "Around 9 am this morning, we received a call on our 112 number stating that a bomb had been planted at Nitin Gadkari’s residence and would explode. We immediately activated our bomb squad and informed the house security..."

ADS

Ad 1
Prev Article
Maus Nanded News : धक्कादायक....! ग्रामीण रूग्णालयात रूग्णाच्या अंगावर चक्क उंदीर खेळताहेत; पहा Viral व्हिडिओ..
Next Article
विदर्भाची बातमी : स्मार्ट मीटर वापरल्याने देयक दुप्पट..! ; ग्राहकांमध्ये तीव्र संताप